प्रशांत माळवदे आदर्श संपादक पुरस्काराने सन्मानित
वृत्त एकसत्ता न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी दिनांक 08/03/2026 :
भाळवणी (ता. पंढरपूर) येथील तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांना मान्यवराच्या हस्ते शाल, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
आम्ही मुंबईकर वृत्तपत्रच्या वतीने पुणे कात्रज येथे उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संस्कृतीक आणि साहित्य रत्न पुरस्कार 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकडे देशमुख होते. कवी भारत कवितके,प्रिया दामले,अभिनेते नीलेश दातार,योगिता कोठेकर, संपादक प्रमोद सूर्यवंशी, उपसंपादिका वसुधा नाईक आदि उपस्थित होते.
यावेळी संपादक प्रमोद सूर्यवंशी म्हणाले की पूर्वी ही माळवदे यांना सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.अचूक व तात्काळ बातम्या प्रसिद्ध करण्यात येत असल्या बद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. असे ही ते म्हणाले.

0 टिप्पण्या