सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ संपन्न

 

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 28/02/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी दिली. या प्रसंगी  प्राचार्यांच्या हस्ते सि. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनी कु.साक्षी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. 

प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे  यांनी  प्रस्ताविकात, भारताचे महान शास्त्रज्ञ सि. व्ही. रमन यांनी लावलेल्या रमन परिणाम (Raman Effect) या शोधाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो या शोधासाठी त्यांना १९३० साली नोबेल पारितोषिक मिळाले.राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे,वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे,विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व समाजाला समजावणे व नवीन संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे. विज्ञान हे प्रगतीचे साधन आहे आणि राष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हेच या दिवसाचे मुख्य उद्धेश आहे असे  सांगितले. 

या वेळी प्राचार्य , सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन कु. श्रेया शिंदे व वैष्णवी जाधव तर आभार  कु. केदार गायत्री यांनी मानले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. भारती चंदनकर व प्रा. जयश्री क्षीरसागर यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या