सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन जयोत्सव 2K26 उत्साहात संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/03/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी दि. 10 मार्च 2026 रोजी " जयोत्सव 2K26 " हे वार्षिक स्नेहसंमेलन संस्था अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स, सिंगिंग, ड्रामा, फॅशनशो या कलागुणांचे सादरीकरण केले.
जयोत्सव 2K26 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते स.म.शंकरराव मोहिते-पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालय ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले, महाविद्यालय विकास समिती सदस्य वसंत जाधव, , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, कार्यालयीन अधीक्षक, समन्व्यक, विद्यार्थी जनरल सेक्रेटरी कु. श्रुती पाटील, सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी कु. पुजा पराडे, स्पोर्ट सेक्रेटरी प्रथमेश माने देशमुख व अण्णाप्पा सूर्यवंशी हे उपस्थित होते. तसेच परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर शेलार व अजिंक्य नवगीरे उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना राजेंद्र चौगुले यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी, शिस्त, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. प्राचार्यानी महाविद्यालयातील सांस्कृतिक उपक्रम हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासास प्रवृत्त करतात, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात, त्यांची प्रतिभा शोधण्यास मदत करतात असे सांगितले.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक क्रिडा स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इ.अँड टी.सी. आणि ए.आय.डी.एस. या दोन पदवी विभागामध्ये जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी विभागुन मिळाल्या बद्दल अभिनंदन केले. तसेच त्यांनी महाविद्यालयाबद्दल आपले विचार व्यक्त करताना सांगितले कि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण घेण्याची सोय व्हावी या दृष्टीकोनातून महाविद्यालयाची स्थापना केली आहे. तसेच विद्यार्थांनी नोकरी बरोबर उद्योगव्यवसायाकडे देखील वळणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच स्थापने पासून ते आज आखेरपर्यंत महाविद्यालयाच्या झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला व सर्व कर्मचारी यांचे तोंडभरून कौतुक केले .
वार्षिक स्नेहसंमेलनाकरीता मोठया प्रमाणात विध्यार्थ्यांनी व पालकांनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. भारती चंदनकर, प्रा. अंकिता फडे, प्रा. सौरभ काटे व वरिष्ठ लिपिक कु. मीनाक्षी राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. अनिल कोकरे, प्रा. सोनल कुंभार व सर्व कर्मचारी यानी काम पाहिले.


0 टिप्पण्या