🔰 "22 वर्षे आपण आमच्यावर विश्वास ठेवला आहे, तसाच इथून पुढेही ठेवावा"- संस्थापक अनंतलाल दोशी
🟩 रत्नत्रय पतसंस्थेचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/03/2026 :
लवकरच आपली पतसंस्था ही स्व मालकीच्या जागेत भव्य अशी इमारत बांधत आहे व यापेक्षा ही चांगली सेवा सभासदांना देण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत. गेली 22 वर्षे आपण आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्याच पद्धतीचा विश्वास इथून पुढेही आपण ठेवावा असे असे आवाहन रत्नत्रय परिवार व रत्नत्रय पतसंस्थेचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी यांनी केले.
सदाशिवनगर (ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील रत्नत्रय पतसंस्थेचा 22 वा वर्धापन दिन कार्यक्रमाचा शुभारंभ रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी व ज्येष्ठ सभासद मोहिद्दीन पठाण यांचे हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने झाला. यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन व सदाशिवनगर गावचे विद्यमान सरपंच विरकुमार दोशी, कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद दोशी, संचालक रामदास गोफणे, जगदीश राजमाने, अजय गांधी, सोमनाथ राऊत, तज्ञ संचालक विलास साळुंखे, सभासद चंद्रकांत तोरणे, जयश्री मोहिते व सचिव ज्ञानेश राऊत यांचे सह मान्यवर उपस्थितीत होते.
प्रमोद दोशी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की रत्नत्रय पतसंस्था ही 22 वा वर्धापन दिन साजरा करत 23 व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे. संस्थेने 23 कोटींच्या ठेवीचा आकडा पार केला आहे. हा आकडा संस्थापक व संचालक मंडळावर सर्व ठेवीदारांनी दाखवलेला विश्वास आहे. आपली संस्था ही संपूर्ण संगणकीकृत असून ऑनलाइन व्यवहार करीत आहे. सर्व सभासदांना एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संस्थेमार्फत सभासदांना भारतात कुठेही डीडी काढणे व एन एफ टी, आर टी जी एस च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे ह्या देखील सुविधा सुरु आहेत. तसेच क्यू आर कोड सुविधा संस्थेमार्फत सभासदांना पुरविल्या असल्यामुळे व्यवहार सुरळीत चालू आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ज्ञानेश राऊत यांनी केले तर आभार संस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी यांनी मानले. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे हेमंत कुलकर्णी, वैभव मोडासे, मंगेश जगताप, टी डी देशमुख, नीता रणवरे, विक्रम पालवे, युवराज वळकुंदे, रणजीत गोरड यांनी काम पाहिले.

0 टिप्पण्या