वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/03/2026 :
दैनंदिन जीवनात एकमेकांशी संभाषण करताना परिस्थितीनुरूप होकार-नकार द्यावा लागतो. होकार ऐकायला सर्वांनाच आवडतो पण एखादे वेळेस जरी नकार दिला तरी समोरच्याला तो रुचत नाही.
एखाद्याने आपल्याला विश्वासाने एखादे काम सांगितले पण आपल्याला ते करणे खरेच शक्य नसेल तर स्पष्ट 'नाही' म्हणता आले पाहिजे. त्या व्यक्तीला काय वाटेल म्हणून स्वतःची मानसिक कुचंबणा करून होय म्हणणे कधीच योग्य नाही.
प्रत्येकवेळेस दुसऱ्याच्या मनाचा विचार करुन स्वतःच्या मनाचा कोंडमारा केल्याने आपले मानसिक आरोग्य बिघडते. मनाविरुद्ध वागल्यामुळे आत्मक्लेश होतात. त्याचा पूर्ण आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
आजचा संकल्प
दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून स्वतःला शक्य नसतानाही होय म्हणण्यापेक्षा आपल्याला शक्य नसेल तर स्पष्ट नाही म्हणू व आपले मानसिक स्वास्थ्य जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या