मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/02/2026 :
पालकत्व निभावताना आपली मुले निर्व्यसनी राहतील यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम पालकांनी निर्व्यसनी राहिले पाहिजे. आपली मुले नकळत आपले अनुकरण करत असतात.
आता व्यसनांचे प्रकार पूर्वीसारखे तंबाखू, सिगरेट, मद्य इतकेच मर्यादित राहिले नाही. चॉकलेटच्या फ्लेवरमध्ये किंवा फळांच्या फ्लेवरमध्ये कोणाला वासावरून शंका सुद्धा येणार नाही असे अंमली पदार्थ उपलब्ध आहेत.
मुलांना पॉकेटमनी देताना त्याचा हिशेब ठेवणे सुद्धा आवश्यक आहे. त्यांना किती मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य द्यायचे हे ठरवताना आपली मुले निर्व्यसनी राहतील, एक सुसंस्कृत नागरिक होतील यासाठी आग्रही रहा.
आजचा संकल्प
मुले डॉक्टर करायची का इंजिनिअर ते नंतर ठरवू पण उद्याच्या भारताचे निर्व्यसनी, निरोगी, निकोप असे आदर्श नागरिक घडवू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या