श्री शिवपार्वती मंदिरात पहाटे महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक व महापूजा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 15/02/2026 : महाशिवरात्रीनिमित्त शंकरनगर अकलूज येथील श्री शिवपार्वती मंदिरात रविवारी पहाटे 5:30 ते सकाळी 7 या वेळेत ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर शंकरनगर अकलूज चे अध्यक्ष विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ शिवांशिकादेवी या उभयतांच्या हस्ते अभिषेक व महापूजा संपन्न झाली.
अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, सौ सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील, श्री शंकर कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सौ सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सह मोहिते पाटील परिवारातील सदस्य, विविध संस्थांचे आजी-माजी संचालक, पदाधिकारी भक्त भाविक उपस्थित होते.
पहाटेपासून रात्री उशीर पर्यंत असंख्य भाविकांनी दर्शनबारी रांगेतून शिस्तबद्धपणे मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला.


0 टिप्पण्या