विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 03/02/2026 : आपल्या मनात जे विचार चालू असतात त्याचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर दिसते, डोळ्यात दिसते. आपल्या डोळ्यातील चमक पाहून आपली बुद्धिमत्ता, आपला आत्मविश्वास लक्षात येतो.
समोरची व्यक्ती मंद आहे का लबाड आहे ते त्याच्या चेहऱ्यावरूनच समजते. समोरच्या व्यक्तीच्या सात्विक चेहऱ्यावरून त्याचा प्रेमळ, मायाळू स्वभाव समजतो. तुमचा चेहरा हा तुमच्या स्वभावाचा आरसा असतो.
मुलांनो, मनात सद्विचार ठेवा, आतून प्रामाणिक रहा, दुर्गुणांपासून दूर रहा. समोरच्याला माणूस समजा, आणि स्वतःमधील माणूस जिवंत ठेवा. तुमचा सात्विक भाव तुम्हाला आनंदी व समाधानी ठेवेल. यशस्वी जीवनासाठी इतकेच करा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या