श्री विश्वेश्वर मंदिर वेळापूर येथे महाशिवरात्र उत्सवा निमित्त महाप्रसाद

श्री विश्वेश्वर मंदिर  वेळापूर येथे महाशिवरात्र उत्सवा निमित्त महाप्रसाद 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत  नायकुडे, 

अकलूज दिनांक 16/02/2026 : ज्ञान भास्कर श्री सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज यांच्या कृपेने श्री विश्वेश्वर मंदिर, मिरगे मळा  वेळापूर येथे महाशिवरात्र उत्सवा निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 23 वर्षापासून महाशिवरात्र निमित्त दुसरे दिवशी  शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी सुर्यकांत महादेव मिरगे, विजय सुर्यकांत मिरगे आपल्या असंख्य समाज बांधवांच्या सहकार्याने परिश्रम घेतात. महाशिवरात्र दिनी रुद्राभिषेक, आरती, भजन, किर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

महाशिवरात्र उत्सवा निमित्त दुसरे दिवशी सोमवार दिनांक 16 रोजी सायंकाळी सात वाजता श्री विश्वेश्वर मंदिर  वेळापूर येथे आयोजित आरतीचे वेळी उपस्थित राहून माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे यांनी पूजा, दर्शन, महाप्रसाद याचा लाभ घेतला. याप्रसंगी विजय सुर्यकांत मिरगे, सागर गजानन शेटे, अमरसिंह माने देशमुख यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या