वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज. दिनांक 11/02/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या चि. देवकुळे ज्ञानदेव व चि. चव्हाण देवदत्त या विद्यार्थ्यांची प्रिसिजन कॅमशाफ्ट सोलापूर या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखती मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
या प्रक्रियेमध्ये मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख देशपांडे जि.जि. व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.

0 टिप्पण्या