छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने उत्साहात साजरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 19/02/2026 :
शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 'श्री छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त गुरूवार दिनांक १९/०२/२०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता श्री शिवपार्वती देवालय, शंकरनगर येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करणेचा सोहळा कारखान्याच्या संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील व सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालक तथा नगरसेवक, अकलूज नगरपरिषद, अकलूज यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सहकार महर्षि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील(माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, विराज निंबाळकर, रामचंद्र ठवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, मा.श्री.बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण,मा.श्री.धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, सौ. हर्षाली निंबाळकर, माजी संचालक भिमराव काळे, भारत फुले, शिवाजीराव सिद, बाळासाहेब पवार,मोहनराव लोंढे, धनंजय चव्हाण तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख, अधिकारी, पत्रकार बंधु, कार्यलक्षी संचालक, जयवंत माने-देशमुख तसेच सर्व कामगार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 टिप्पण्या