आपण खरंच प्रगल्भ आहोत का?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/02/2026 :
Maturity work in progress
आपल्या जगण्यात एक प्रकारची सहजता असते पण कधी कधी मात्र नात्यात विचित्र अनुभव येतात. माणसं वयाने मोठी होतात पण राग रुसवे, मानापमान, तुलना, बदला, गाॅसिपिंग हे सासू सून, भाऊ भाऊ, बाॅस एम्प्लॉईज, जावा जावा, मित्रामित्रात होतात. जेव्हा वादविवाद, भांडणं होतात तेव्हा आपलं मन म्हणतं कसा वागतोय हा जराही मॅच्युरिटी नाही याला. कशी रिॲक्ट करते ही थोडीही प्रगल्भता कशी नाही हिला. पण मॅच्युअर्ड असणं म्हणजे आपण त्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करतो ह्याचा जरा विचार करायला हवा. खरं म्हणजे मॅच्युअर्ड होणं हे 'वर्क इन प्रोग्रेस' सारखं असतं. ती सतत चालत राहणारी प्रोसेस असते.
काय असते प्रगल्भता? :
What is maturity?
● जेव्हा समोरच्याच्या वागण्यातला बदल जाणवतो तेव्हा त्रागा करत न बसता तो बदल स्वीकारणं.
●कळलंय काय ते मग हसून त्यातून बाहेर पडणं ही असते मॅच्युअरिटी.
●मोठमोठ्या गोष्टी बोलत बसण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणं हे असतं प्रगल्भ होणं.
●मॅच्युअर्ड होण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.
●कारण दोष देण्यात वेळ न घालवता माफ करणं, लोकांच्या बाबतीत त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं, जजमेंटल न होणं, आपल्या विचारांबरोबरच त्याबाबत असलेली मतभिन्नताही स्वीकारणं आणि ओपन माईंडेड राहणं, तुमच्यावर प्रेम करावं हे वाटत असलं तरी त्याकरता जबरदस्ती न करणं. हे मॅच्युअर्ड होणं असतं. या गोष्टी तुमच्यात आहेत का हा विचार करा.
●एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता,कसं समजून घेता, समोरच्याला, त्या प्रसंगाला कसं कन्सिडर करता, त्यावेळी कसा संवाद करता, कसे रिॲक्ट होता, कोणत्या व्हॅल्यूजना महत्व देता, स्वतःला त्या त्या प्रसंगात कसे रिप्रेझेंट करता ह्या गोष्टीत दिसते तुमची प्रगल्भता.
●थोडक्यात आपल्या डिग्निटीच्या सगळ्या मर्यादा सांभाळून तुम्ही कसा विचार करता, बोलता, वागता,
●आपल्या भावना कशा व्यक्त करता हे असते तुमचं मॅच्युअर्ड होणं.
●खूप संयम लागतो यासाठी.कधी बोलायचं, कधी शांत रहायचं, कधी कणखरपणा दाखवायचा, कधी स्टॅण्ड घ्यायचा, कधी जुळवून घ्यावंचं हे जमणं म्हणजे मॅच्युअर्ड होत राहणं.
जसं सुरवंटाचं होतं फुलपाखरू. हिरव्यागार कैरीचा होतो पिकून रसाळ, मधुर आंबा, नाजूक कळीचं होतं सुगंधित फूल. हे प्रगल्भ होणं इतकं अलवार असतं. यात एक वेगळंच समाधान असतं. स्वतःलाच शांत वाटतं.
स्वतःबद्दलचा आदर वाटायला लागतो. मन कसं तणावमुक्त होतं. खरं म्हणजे आयुष्य दीर्घ असतं पण प्रगल्भता त्याहीपेक्षा खूप खोलवर रुजवत न्यायची असते म्हणून 'वर्क इन प्रोग्रेस' म्हणजे मॅच्युरिटी हे लक्षात घेऊन ती फुलवत नेण्यात खरेच खूप आनंद आहे.
डाॅ. स्वाती गानू
✍️ प्रसारक : प्रविण सरवदे, कराड

0 टिप्पण्या