सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल विभागाचा औद्योगिक अभ्यास दौरा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 16/02/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड. रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयाची विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पदविका इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग विभागाची औद्योगिक भेट सातारा येथील सुपरमॅक इंजीनियरिंग सर्विस विभागास देण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना उद्योगातील कार्यपद्धती, विद्युत यंत्रसामग्री, ऊर्जा उपयोग, उपकरणांची देखभाल तसेच औद्योगिक सुरक्षितता नियमांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उद्योगातील शिस्तबद्ध कामकाज, सुरक्षिततेचे महत्त्व व व्यावसायिक कार्यसंस्कृती याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या औद्योगिक अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकविलेल्या सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक वापर समजण्यास मदत झाली. हा अभ्यासदौरा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला.
प्रत्येक यंत्रणा आणि त्यांची कार्यप्रणाली याबद्दलच्या शिक्षकांच्या आणि तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना खूप काही शिकता आलं. विविध उपकरणे त्यांची सुरक्षा प्रणाली आणि त्यांच्या वापराचे महत्त्व समजून घेतल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची खरी क्षमता कशी आहे हे कळालं. या औद्योगिक भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात नक्कीच फायदा होईल या औद्योगिक भेटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे शिक्षक व द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या औद्योगिक भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले व डिप्लोमा इलेक्ट्रिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. कांबळे एस.एस. तसेच प्रा. पी. आर. देवकते, प्रा. पी. व्ही. टेकाळे, प्रा. फुले पी.जी. व प्रा. भाकरे पी. एल. यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

0 टिप्पण्या