सहकार महर्षि कारखान्यामध्ये संस्थापक सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते-पाटील यांची पुण्यतिथी साजरी...
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज. दिनांक 11/02/2026 :
सहकार महर्षि कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षि कै. शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांची ४७ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
यानिमित्त विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, (माजी उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य), चेअरमन-जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, (सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज) व त्यांचे कुटूंबीय तसेच कारखाना व विविध संस्थाचे पदाधिकारी, खातेप्रमुख व कामगार यांनी सहकार महर्षि काकासाहेब यांचे समाधीचे दर्शन घेतले.
त्यानंतर सहकार महर्षिच्या प्रतिमेची मिरवणूक शिवरत्न बंगला येथील समाधीस्थळ, हनुमान मंदीर या रस्त्याने सहकार महर्षि कारखाना मुख्य कार्यालयापर्यंत भजन, गायन करित काढण्यात आली. तद्नंतर मुख्य कार्यालयाचे समोरील संस्थापक सहकार महर्षि कै. काकासाहेब यांचे पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून तसेच विधीवत पूजन कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख यांचे व इतर मान्यवर शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर दिपआरती करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये सहकार महर्षिच्या जीवनावरील गीत गायन व मराठी, हिंदी व इंग्रजीतून शालेय विद्यार्थीनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, शंकरनगर च्या विद्यार्थ्यांनी सहकार महर्षिचे जिवनावरील समुह गीत गायन केले त्याच प्रशालेच्या विद्यार्थीनी कु.भुमिका कारमकर, कु. इरिना पठाण व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, शंकरनगर ची विद्यार्थीनी कु. श्रावणी मोहिते यांनी मराठीतून तसेच सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश स्कुल, धवलनगर च्या विद्यार्थीनी कु. तन्वी भांगे हिने हिंदीतून व कु. राजनंदिनी गायकवाड यांनी इंग्रजीतून मनोगत व्यक्त केले. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कारखान्याचे पदाधिकारी व अधिकारी यांचेकडून बक्षीस वाटप करण्यात आले.
सहकार महर्षि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील( माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षि यांचे पुण्यतिथीनिमित्त या कालावधीत वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात.
सदर दिवशी रात्री ८.०० ते १०.०० या वेळेत ह.भ.प.श्री. अंकुश महाराज रणखांबे, रा.गिरवी यांचे सुश्राव्य श्रीहरी किर्तन होणार आहे. त्याचा लाभ पंचक्रोशितील भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाकरिता कारखान्याचे संचालक सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, रावसाहेब मगर, विराज निंबाळकर, रामचंद्र ठवरे, जयदिप एकतपुरे तज्ञ संचालक-रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक जयवंत माने-देशमुख व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, धनंजय सावंत, श्रीकांत बोडके, राजेंद्र भोसले, अनिलराव कोकाटे, सौ. हर्षाली निंबाळकर तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व कारखान्याचे माजी संचालक धनंजय चव्हाण, भिमराव काळे, भारत फुले, मोहराव लोंढे तसचे श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लीक ट्रस्टचे ट्रस्टी श्रीकांत राऊत, श्रीमती वसुंधरा देवडीकर, तुकाराम जाधव व संतोष माने तसेच कारखान्याचे खातेप्रमुख, अधिकारी व कामगार मोठ्या संसथेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी, कामगार व शालेय विद्यार्थी यांचे आभार विजय गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी, श्री चंद्रकांत कुंभार यांनी मानले.


0 टिप्पण्या