सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 'मराठी राजभाषा गौरव दिन' उत्साहात साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/02/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये थोर साहित्यिक, कवी आणि नाटककार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच 'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस. हा दिवस 'मराठी राजभाषा गौरव दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी दिली.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते कवि 'कुसुमाग्रज' यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी पताळे ,श्रुती बनसोडे ,हर्षदा मगर ,ऋतुजा भांडवलकर ,भक्ती साखळकर, गिरीशा कांबळे,साक्षी परदेशी, दिव्या राऊत व सानिका सरडे यांनी काव्यवाचन केले.
प्राचार्य डॉ प्रविण ढवळे यांनी प्रस्ताविकामध्ये मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आपली संस्कृती, आपली ओळख आणि आपला अभिमान आहे असे सांगितले व वि. वा.शिरवाडकर म्हणजेच 'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिनाच्या आणि 'मराठी राजभाषा गौरव दिनाच्या' सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमानंतर विद्यार्थिनींनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचे वाचन केले.
या प्रसंगी प्राचार्य , महाविद्यालय समन्वयक, कार्यालयीन अधिक्षक, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. मानसी माने व कु. सृष्टी वाघ यांनी केले.

0 टिप्पण्या