🔰 रस्ता अडवल्याने शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा ⭕ तहसीलदारांच्या आदेशाने खुला केलेला रस्ता पुन्हा अडविल्याची तक्रार 💢 ऊस शेतातच जळू लागल्याने शेतकरी अगतिक

🔰 रस्ता अडवल्याने शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

⭕ तहसीलदारांच्या आदेशाने खुला केलेला रस्ता पुन्हा अडविल्याची तक्रार

💢 ऊस शेतातच जळू लागल्याने शेतकरी अगतिक 

वृत्त एकसत्ता न्यूज

अकलूज दिनांक 18/02/2026 :

वांझोळी (ता. खटाव) येथील शेतरस्त्याचा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास  उषाचा फड पेटवून सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा चार शेतकऱ्यांनी दिला आहे.

बजरंग मल्हारी गोयकर, शंकर भाऊ शेंडगे, शिवाजी खाशाबा शेंडगे, तात्यासाहेब दादा शेंडगे अशी या पीडित शेतकऱ्यांची नावे आहेत. या शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वांझोळी येथील या शेतकऱ्यांची खटाव तहसीलदारांसमोर मामलेदार कोर्ट कचेरी कलम ५ नुसार प्रकाश पांडुरंग सुढके, सुभाष पांडुरंग सुढके, संपत मिकू सुढके, अंकुश तुकाराम सुढके, तात्याबा संपत सुढके यांच्या विरोधात शेतरस्त्याची केस सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार वरील इसमांच्या गट नं. २१४ मधून पूर्वपार नकाशामध्ये असलेला गट नं. २१० भूषणगड-औंध रस्त्याच्या उत्तर बाजूला गट नं. २१० मधून पूर्व-पश्चिम गट नं. २१२,२११ पर्यंतचा येणे-जाणेचा बैलगाडी रस्ता खुला करण्याची मागणी आहे.

याबाबत ८ ऑगस्ट २०१६ रोजी तत्कालीन तहसीलदार यांनी रस्ता खुला करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही या रस्त्याचा २०२५ पर्यंत वापर केला. आता पुन्हा वरील प्रतिवादी लोकांनी दांडगाव्याने आमचा शेतरस्ता बंद केला आहे. 

अर्जदार बजरंग गोयकर यांचा दोन एकर ऊस शेतात जळून जाऊ लागला आहे. तर शंकर भाऊ शेंडगे व इतर दोघांची ऊस लागवड तसेच अन्य मशागतीची कामे रखडली आहेत. आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद होण्याच्या मार्गावर आहे. आठवडाभरात कारखान्याने ऊस नेला नाही, तर उभ्या शेतातच तो जळून जाण्याची भीती आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने रस्ता खुला करून द्यावा; अन्यथा उसाचा फड पेटवून त्याच ठिकाणी सामूहिक आत्मदहन केले जाणार आहे. कावदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा ही दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या