प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संचलित जेष्ठ नागरिक मोफत वाचनालयाची वर्षपुर्ती

 

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संचलित 

जेष्ठ नागरिक मोफत वाचनालयाची  वर्षपुर्ती

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 26/02/2026 :

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने  अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व अकलूज नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळेवाडी -  अकलूज परिसरात जेष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत वाचनालयास एक वर्ष पूर्ण झाले. सदर वाचनालयाचे उद्घाटन सौ.देवन्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने मोफत जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू केल्यामुळे या परिसरातील जेष्ठ नागरिकांना जिल्हातील, तालुक्यातील व गावातील सामाजिक व राजकीय घडामोडी वृत्तपत्राच्या माध्यमातून समजू लागल्या आहेत.या स्तुत्यपर उपक्रमामुळे वयोवृद्धांसाठी हे वाचनालय एक विरंगुळ्याचे ठिकाण ठरले आहे.या वाचनालयामुळे त्यांच्या आनंदात व ज्ञानात भर पडत आहे.हे वाचनालय सुरू करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने,अकलूज शहराध्यक्ष संजय लोहकरे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या