"रायगड प्रतिष्ठान" तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यानमाला संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/02/2026 :
हनुमान वाडी निमगाव (मगराचे) तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील रायगड प्रतिष्ठान च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेली व्याख्यानमाला संपन्न झाली. प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी मारुती मगर यांनी स्वागत पर प्रास्ताविक केले तर प्रमुख पाहुण्यांचा सन्मान अभिजीत बाळासाहेब मगर यांनी केला.
गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत राजवर्धन हर्षवर्धन मगर, गणेश सुनील मगर, श्रीराज सुनील मगर, जान्हवी राजेंद्र जाधव, स्वरांजली रणजित मगर, आर्वी अमोल मगर, सृष्टी समाधान मगर, ओम शिवाजी मगर, विशाखा अण्णासो मगर यांच्यासह प्रमुख व्याख्याते साहित्यक, इतिहासकार हनुमंत मारुती पवार व्याख्यानमालेमध्ये पुष्पगुंपले.
प्रारंभी प्रमुख व्याख्याते हनुमंत मारुती पवार यांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन संपन्न झाले. जयंतीनिमित्त हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व अबाल वृद्ध श्रोत्यांसाठी रायगड प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी तानाजी बोडरे यांनी आभार मानले.
आदर्शवत पद्धतीने साजरी करण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले. हजारो अबाल वृद्धांच्या उत्साह पूर्ण साक्षीने व्याख्यानमाला यशस्वी ठरली. कोणतीही गडबड नाही, गोंधळ नाही, डीजे डॉल्बी तर सोडाच गोंगाट करणारे कोणतेही वाद्य नाही. व्याख्यात्याच्या पुढे फक्त पर्यावरण पूरक ठरणारी माइक साऊंड सिस्टिम होती. सुमारे 5000 श्रोत्यांना बसण्यासाठी भव्य सभामंडप उभारण्यात आलेला होता. सर्वांसाठीच भारतीय बैठक व्यवस्था केलेली होती.

0 टिप्पण्या