माझी मराठी अष्टाक्षरी काव्य

 माझी मराठी

अष्टाक्षरी काव्य

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 27/02/2026 :

माझी मराठी मराठी 

थोर संतांच्या ग ओठी

जरी नाठाळ खट्याळ 

माया साठवते पोटी

ज्ञानेश्वरी गीता वेद

मराठीची बाळे थोर

भरजरी अलंकार  

घाले मायेची पाखर

वळवावी तशी वळे

खाण अनेक अर्थाची 

तिच्या छटा तिचा बाणा

माया लावते आईची

प्रिय तिला संतवाणी 

पंडितांना मुखोद्गत

बसे गद्यात,पद्यात 

प्रत्येकाच्या ह्रदयात

अलंकृत माझी माय

मळा ज्ञानाचा फुलतो

ओव्या अभंग,गझल

तिचा वावर चालतो

प्रा.मानसी जोशी

 ठाणे प.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या