विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 23/02/2026 :

आपण आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा आदर ठेवावा, त्यांचे म्हणणे ऐकावे असे आपल्याला नेहमी सांगितले जाते. ऐकायचे म्हणजे फक्त एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणे नव्हे.

पालकांचे, शिक्षकांचे ऐकायचे म्हणजे जे सांगितले त्याचे अनुकरण करायचे, तसे वागायचे. आपण सुविचार वाचतो, संतवचने ऐकतो ती फक्त ऐकायची नाहीत तर त्यातील उपदेशाप्रमाणे वर्तन करायचे.

मुलांनो, आपण आज्ञा शिरसावंद्य आहे असे म्हणतो याचा अर्थ जे काही सांगितले त्याचा आम्ही नम्रपणे स्वीकार करत आहोत. पूर्वीच्या काळी जशी राजे लोकांचे सांगणे म्हणजे हुकूम असायचा, लोक तसेच वागायचे. 

मोठ्यांच्या उपदेशाप्रमाणे वागणे म्हणजे स्वतःला घडवणे.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या