🔰 शंकरराव मोहिते महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनामित्त 'कॉलेज कट्टा' उपक्रम संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/02/2026 :
अभिमान मराठीचा, सन्मान साहित्याचा
आज घुमला आवाज अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालय कॅालेज कट्ट्याचा!
शब्दांतून उमटले भाषेचे वैभव थोर,
मराठी मातीचा वारसा, आमचा हाच मान थोर!
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून 'कॉलेज कट्टा' या अभिनव उपक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..."
महाविदयालय विकास समितीचे अध्यक्ष नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध उपक्रम आयोजित केले जातात त्यापैकी या वेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज, सहकार महर्षि आणि राजमाता आक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर व ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. शिरीष शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
" कॅालेज कट्टा" यामध्ये उत्स्फूर्त असा एकूण १७ विद्यार्थ्यांनी आपल्या ओथंबलेल्या भावना कविता, मनोगते आणि साहित्यातून व्यक्त करीत तरुणाईच्या आवाजात मराठी भाषेचा स्वाभिमान घुमविला. प्रा. सौ. पताळे मॅडम यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. संपूर्ण सादरीकरणाचे नेटके नियोजन आणि निवेदन डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वय समितीचे सदस्य डॅा निवृत्ती लोखंडे, प्रा विनायक माने, प्रा प्रसाद लोहार व सर्व सहकारी प्राध्यापक यांनी प्रयत्न केले. आभार डॅा. जनार्दन परकाळे यांनी मानले.

0 टिप्पण्या