शंकरनगर-अकलूज येथील महाशिवरात्र यात्रेस प्रारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 11/02/2026 : महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी महाशिवरात्र यात्रेचे आयोजन बुधवार दि.११/०२/२०२६ ते सोमवार दि.१६/०२/२०२६ या कालावधीमध्ये केले असून यात्रा व कृषी, औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, (माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), यांचे प्रमुख उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते बुधवार दि.११/०२/२०२६ रोजी सायं. ५.०० वाजता संपन्न झाले. यावेळी कारखान्याच्या संचालिका मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
महाशिवरात्र यात्रा, कृषी व औद्योगिक प्रदर्शन, पीक प्रदर्शन व स्पर्धा, दुग्ध स्पर्धा, जनावरांचा बाजार तसेच जंगी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्र यात्रेमध्ये कृषी व औद्योगिक स्टॉल, अवजारे, ड्रिप एरिगेशन, ट्रॅक्टर व औजारे तसेच लहान मुलांकरिता खेळणी स्टॉल, विविध पाळणे, अल्पोपाहार व रसपान गृह स्टॉल मोठ्या प्रमाणात आले आहेत. यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणत रेलचेल होत असून यात्रेकरिता लाखोच्या संख्येने भावीक येतात, त्यांचेकरिता यात्रा कालावधीमध्ये २४ तास पाणी, वीज, पर्यायी रस्ते तसेच आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व त्या सुविधा महाशिवरात्र यात्रा समिती, अकलूज यांचे वतीने उपलब्ध केलेल्या असून त्यासाठी स्वतंत्र यात्रा ऑफिस करण्यात आले आहे.
यात्रेमध्ये शनिवार १४/०२/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पीक स्पर्धेमध्ये आलेल्या शेती मालाचे परीक्षकांकडून निरिक्षण व निवड तसेच दुपारी ४.०० वा. जातीवंत जनावरांची निवड होणार आहे. रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी पहाटे ५.३० वा. महाशिवरात्री निमित्त श्री शिवपार्वतीस अभिषेक व महापूजा, सकाळी ६.३० ते ७.०० या वेळेत दुग्ध स्पर्धाचे आयोजन केले असून यात्रेमध्ये होणा-या सर्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करणेचा कार्यक्रम सदर दिवशी सायं. ५.०० वा. यात्रा ऑफिस समोर होणार आहे. सोमवार दि.१६/०२/२०२६ रोजी दुपारी ३.०० वा. मल्लांच्या जंगी कुस्त्याच्या फडाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. तसेच रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी रात्री ८.०० वा. यात्रा व पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांकरिता मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा होणार आहे.
अकलूज येथील रूपाली मशिनरी व पाईप्स या दुकानास गुरूवार दि.०५/०२/२०२६ रोजी पहाटे ४ वा. शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती, त्यावेळी तातडीने सहकार महर्षि कारखाना कर्मचारी ज्ञानदेव पोळ, चेकींग हवालदार, सत्यजीत चव्हाण, वॉचमन व बाळासाहेब मोरे, वाहन चालक यांनी आग विझविण्यासाठी व आगीत सापडलेल्या कुटूंबाला बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली होती. त्यांच्या या धाडसी कार्याची नोंद घेऊन त्यांचा सत्कार मानाचा फेटा, शॉल, श्रीफळ, पुष्पहार देऊन
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, व मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील तसेच कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाकरिता कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, रामचंद्र ठवरे, जयदिप एकतपुरे तज्ञ संचालक-प्रकाशराव पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक जयवंत माने-देशमुख व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, श्रीकांत बोडके, राजेंद्र भोसले, अनिलराव कोकाटे, सौ. हर्षाली निंबाळकर तसेच जनरल सेक्रेटरी राजेंद्र चौगुले व कारखान्याचे माजी संचालक विजय हेगडे, मोहनराव लोंढे, विविध संस्थेचे पदाधिकारी व कारखान्याचे खातेप्रमुख, अधिकारी, कामगार व नागरीक तसेच सहभागी विविध स्टॉल धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, पदाधिकारी, पत्रकार बंधू, अधिकारी, कामगार यांचे आभार सेक्रेटरी अनिल काटे यांनी मानले.प

0 टिप्पण्या