शृंगार मराठीचा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/02/2026 :
"अनुस्वारी" शुभकुंकुम ते
भाळी सौदामिनी |
"प्रश्नचिन्ही" डुलती झुमके
सुंदर तव कानी |
नाकावरती "स्वल्पविरामी"
शोभे तव नथनी |
"काना" काना गुंफुनी माला
खुलवी तुज मानिनी |
"वेलांटी" चा पदर शोभे
तुझीया माथ्याला |
"मात्रां" चा मग सूवर्णचाफा
वेणीवर माळला |
"उद्गारा" चा तो गे छल्ला
लटके कमरेला |
"अवतरणां" च्या बटा
मनोहर भावती चेहर्याला |
"उ" काराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरी |
"पूर्णविरामी" तिलोत्तम तो
शोभे गालावरी ॥
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!...
मिलिंद चिटणीस

0 टिप्पण्या