मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे, अकलूज.

दिनांक 03/02/2026 :

जीवनात अनेक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात तशा मनाविरुद्ध पण घडतात.  इच्छा नसली तरी त्या गोष्टींना सामोरे जावे लागते. नको असले तरी स्वीकारावे लागते.

आपण निःस्वार्थपणे वागावे, वागण्या बोलण्यात नम्रपणा असावा, स्वभाव संयमी असावा असे आपल्याला मनापासून वाटत असताना आपल्याशी कोणी उद्दामपणे बोलले, अहंकाराने वागले तर आपल्याला मानसिक त्रास होतो.

दुसऱ्याने कसे वागावे हे आपण ठरवू शकत नाही पण त्यांचे आपल्याशी वागणे आपल्याला नक्कीच त्रासदायक जाणवते. अशावेळेस दुर्लक्ष करणे किंवा तिथून निघून जाणे योग्य ठरते.

आजचा संकल्प

दुसऱ्याच्या वागण्याने स्वतःला मनस्ताप होत असेल तर ती संगत सोडणे योग्य. समविचारांच्या संगतीत राहू व यशस्वी जीवन जगू.

सौ. स्नेहलता स. जगताप ======================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या