कै.सौ.लक्ष्मी अर्जुन कळसाईत यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/02/2026 :
अकलूज लोहार समाजाचे अध्यक्ष पै.यशवंत अर्जुनराव कळसाईत यांच्या मातोश्री कै.सौ.लक्ष्मी (माया) अर्जुन कळसाईत यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त श्री विश्वकर्मा संघटनेतर्फे "वृक्षारोपण व खाऊ वाटप " करण्यात आले. अकलूज नगरपरिषदेतील भा.ज.पा. नगरसेविका सौ.दिपाली संतोष वाघमोडे आणि पै.यशवंत अर्जुन कळसाईत (संस्थापक विश्वकर्मा संघटना) शुभहस्ते वृक्षारोपण व अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
नगरसेविका सौ.दिपालीताई संतोष वाघमोडे यांचा सत्कार सौ.मयुरीताई यशवंत कळसाईत यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अब्बास शेख, संतोष वाघमोडे, योगेश शिंदे, संजय साळुंखे,संतोष घोडके, अंकुश थोरात आदि उपस्थित होते.


0 टिप्पण्या