विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/02/2026 :
आपण काल मराठी राष्ट्रभाषा दिन साजरा केला. भरपूर माहिती वाचली. शाळेत पण मराठीचे महत्व, मोठेपणा विषद करणारे भाषण झाले असेल. आपण प्रत्येकजण प्रभावित झाला असाल.
मराठी आपली मातृभाषा आहे याचा फक्त अभिमान नको. आपण दैनंदिन जीवनात एकमेकांशी त्याच भाषेत बोलले पाहिजे. इतर भाषेतील शब्द न वापरता शुद्ध मराठीत बोलणे जमलेच पाहिजे.
मुलांनो, फक्त वाचून किंवा लिहून मातृभाषा जपता येत नाही त्यासाठी बोलावे लागते. पुढील पिढीत ही भाषा पोहोचवायची असेल तर मुलांशी त्याच भाषेत संवाद साधणे व त्यांनी मातृभाषेतच प्रतिसंवाद साधने गरजेचे आहे.
मातृभाषेचा नियमित वापर भाषा पिढ्या न पिढ्या जपते.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या