शंकरनगर-अकलूज येथे महाशिवरात्र यात्रा विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 18/02/2026 :
महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यावर्षी महाशिवरात्र यात्रेचे आयोजन बुधवार दि.११/०२/२०२६ ते सोमवार दि.१६/०२/२०२६ या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाली.
यात्रा व कृषी, औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रमुख उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते बुधवार दि.११/०२/२०२६ रोजी सायं. ५.०० वाजता संपन्न झाले. यावेळी कारखान्याच्या संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील तसेच सहकार महर्षि कारखाना संचालक, विविध स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर स्टॉलधारक व नागरीक उपस्थित होते.
शनिवार १४/०२/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पीक स्पर्धेमध्ये आलेल्या ऊभी पिके, फळभाज्या व पालेभाज्या, फळे, फुले व औषधी वनस्पती यांचे एकुण ५८२ नमुन्यामधील उत्कृष्ट नमुन्याची निवड शासकीय कृषी विभागाचे अधिकारी सतीश कचरे, उदय साळुंखे, सौ.जे.के. खरात, रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूजचे प्राध्यापक एस. एस. भोसले व ए.बी. शिंदे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी ए.पी. गायकवाड यांनी केली. यामध्ये एकुण २५१ नमुने बक्षीसपात्र झाली. यावेळी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील व श्री. रामचंद्रराव सावंत पाटील, माजी संचालक भारत फुले, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, सेक्रेटरी अनिल काटे, शेती अधिकारी रविराज चव्हाण व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच दिवशी दुपारी ४.०० वा. जातीवंत जनावरांची निवड त्यामध्ये एकुण १०२ जनावरांची नोंद झाली होती त्यापेकी ६२ जातीवंत जनावरे बक्षीसपात्र झाली आहेत. सदरच्या निवडीकरिता परिवेक्षक पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अरूण ननवरे, डॉ. शशिकांत राऊत, डॉ. प्रविण शिंदे. डॉ. अहमद मुल्ला, डॉ. अमोल सातपुते, डॉ. अनिल शिंदे, डॉ. सचिन कपणे तसेच हनुमंत काळे यांनी केले. यावेळी मदनसिंह मोहिते-पाटील, चि. सयाजीराजे मोहिते-पाटील, शंकरराव माने-देशमुख, संचालक रावसाहेब पराडे, रामचंद्र सिद व माजी संचालक भिमराव काळे व पशु मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी पहाटे ५.३० वा. महाशिवरात्री निमित्त श्रीशिवपार्वतीस रुद्राभिषेक व महापूजा विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष-ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, शंकरनगर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते-पाटील या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाली. त्यावेळी आरती करिता आमदार रणजितसिह विजयसिंह मोहिते-पाटील, सदस्य विधान परिषद व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते-पाटील व इतर मान्यवर तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाशिवरात्री निमित्त श्री शिवपार्वतीचे दर्शन विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते-पाटील जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, सौ. कांचनमाला मदनसिंह मोहिते-पाटील खासदार धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील, चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील या मान्यवरांनी तसेच पंचक्रोशील भाविकांनी लाखोच्या संस्थेने घेतले.
तसेच सदर दिवशी रात्रीची महापुजा सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील (मासाहेब) यांचे शुभहस्ते संपन्न झाली.
सदर दिवशी सकाळी ६.३० ते ७.०० या वेळेत दुग्ध स्पर्धा संपन्न झाल्या. या सर्व स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील व चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील तसेच इतर मान्यवरांचे शुभहस्ते याच दिवशी सायं. ५.०० वा. यात्रा ऑफिस समोर संपन्न झाला.
यात्रेमध्ये रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी रात्री ८.०० वा. मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यासाठी तमाशा रसिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी महाशिवरात्र महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज चे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते तमाशा फडाच्या मालकीन सौ. मंगला बनसोडे व नितीन बनसोडे यांचा सत्कार करणेत आला. त्यावेळी तमाशा मंडळाकडून जयसिंह मोहिते-पाटील यांचा सन्मान संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे संचालक, शिवसृष्टी किल्ला संचालक व इतर मान्यवर तसेच तमाशा रसीक उपस्थित होते.
सोमवार दि.१६/०२/२०२६ रोजी दुपारी ३.०० वा. मल्लांच्या जंगी कुस्त्याच्या फडाचे उद्घाटन विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व कार्याध्यक्ष मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, तसेच शिवतिर्थ कुस्ती आखाडा प्रमुख चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते झाले व कुस्ती स्पर्धेमध्ये नामांकीत मल्लांच्या एकुण २०० कुस्त्या झाल्या. यामध्ये मुख्य लढत पै. राहूल सुळ, हनुमान आखाडा, पुणे, व पै. श्रीमंत भोसले, व्यंकोबा मैदान, इचलकरंजी कोल्हापूर यांचेमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये पै. श्रीमंत भोसले, व्यंकोबा मैदान, इचलकरंजी कोल्हापूर हे विजेते ठरले.
महाशिवरात्र यात्रेमध्ये लहान मुलांकरिता खेळणी स्टॉल, विविध पाळणे, अल्पोपाहार व रसपाणगृह स्टॉल मोठ्या संस्थेने आले होते. यात्रेकरिता लाखोच्या संस्थेने भावीक उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. आलेल्या भार्विकासाठी यात्रा कालावधीमध्ये चोवीस तास पाणी, वीज, पर्यायी रस्ते तसेच स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व त्या सुविधा उपलब्ध केल्याने मोठ्या आनंददायी वातावरणात व उत्साहात महाशिवरात्र यात्रा संपन्न झाली.





0 टिप्पण्या