उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रलंबित कामांबाबत घेतली भेट

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रलंबित कामांबाबत घेतली भेट

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे, 

अकलूज दिनांक 16/02/2026 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ठाणे येथे सदिच्छा भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अंतर्गत प्रलंबित रखडलेल्या रस्ते व पुलांच्या कामांमुळे वाहतूक कोंडी,अपघाताचा धोका तसेच नागरिकांना होणाऱ्या अडचणींबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंत्री महोदयांचे लक्ष वेधले व प्रलंबित कामांना तातडीने पूर्ण करणे निर्देश द्यावे म्हणून विनंती केली.

तसेच मतदारसंघातील अकलूज, करमाळा,माढा व नातेपुते येथील नगरपरिषद व नगरपंचायती अंतर्गतपाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, अंतर्गत गटार योजना,सार्वजनिक सुविधा व नागरी विकासाशी संबंधित विविध विकास कामांचे निवेदन दिले व तातडीने मंजुरी देण्यात यावी म्हणून विनंती केली…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रस्तावांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले.या भेटीमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार असून नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल,असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या