मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे

अकलूज दिनांक 20/02/2026 :

 दैनंदिन जीवनात एकमेकांच्या बद्दल विश्वास वाटणे खूप महत्वाचे आहे. समोरची व्यक्ती आपल्याशी प्रामाणिक राहील, फसवणार नाही याची खात्री म्हणजे त्या व्यक्तीविषयी वाटणारा विश्वास.

कधी कधी आपला स्वतःवरच विश्वास नसतो. एखादे काम आपण करू शकू, आपल्याला जमेल, आपण सहज करू याविषयी साशंक असतो. अशावेळेस आपल्याकडे आत्मविश्वास हवा.

ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे अशी व्यक्ती अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करण्यासाठी पुढे सरसावते व करूनच दाखवते. धैर्यप्राप्तीसाठी, यशस्वी होण्यासाठी सकारात्मक राहणे व आत्मविश्वास जागृत ठेवणे फार गरजेचे आहे.

आजचा संकल्प

आपण आपले गुरुजन, दैवते यांच्यावर विश्वास ठेवून काही अवघड गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करतो. जोडीला जिद्द व आत्मविश्वास जागृत ठेवू व ध्येय प्राप्त करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या