सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांची पुण्यतिथी साजरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज. दिनांक 11/02/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयात सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांची ४७ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रेया शिंदे तसेच मानसी माने यांनी सहकार महर्षि यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेचा आढावा सांगितला आणि सहकार महर्षि यांच्या कार्याची ज्योत कायम आपल्या कामातून तेवत ठेवूया असे सांगितले.
या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख व्याख्याते शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलूज चे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. विश्वनाथ आवड यांनी सहकार महर्षिंच्या जीवनकार्याचा परिचय करुन देताना सांगितले कि सोशल इंजिनियरिंगच्या माध्यमातून सहकार सिस्टीम त्याकाळी काकासाहेबांनी उभा केली. तसेच काकासाहेबांच्या विचारांचा वारसा जोपासल्याने मोहिते पाटील कुटुंबातील चौथी पिढी देखील सक्रिय समाजकार्य करत आहे. व प्रेरणा कदम या विद्यार्थिनीने परिस स्पर्श या कादंबरीचे वाचन केल्याबद्दल तिचा सत्कार व्याख्यात्याच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. भारती चंदनकर व आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक मीनाक्षी राऊत यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे, महाविद्यालयाचे समन्वयक, कार्यालयीन अधीक्षक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

0 टिप्पण्या