विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/02/2026 :
दोन दिवसांपूर्वी आपण शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत, आपला आदर्श आहे. त्यांचे चरित्र म्हणजे प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग. किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत!
महाराज एक आदर्श पुत्र होते, आदर्श पती होते, आदर्श पिता होते, आदर्श बंधू होते. ते एक आदर्श राजा होते, आदर्श व्यक्ती होते. शत्रू सुद्धा त्यांना मानत होता, त्यांचे मोठेपण मान्य करत होता.
मुलांनो, आई-वडील, गुरुजनांशी आदराने वागा, मित्रांना अंतर देवू नका, मुलींचा-स्त्रियांचा आदर ठेवा. झाडे लावा-वाढवा. पाणी जपून वापरा. लोकांच्या वस्तुला हात लावू नका. कोणाच्या धर्माला नावे ठेवू नका.
आजच्या घडीला सुद्धा महाराजांचे विचार चारित्र्यसंवर्धनासाठी उपयुक्त आहेत. त्यांचे अनुकरण करा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या