सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न   

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे, 

अकलूज दिनांक 20/02/2026 :अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये दि.19/02/2026रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी कु.श्रेया शिंदे पोवाडा सादर केला तर कु.साक्षी जाधव व कु.गीता रितोंड यांनी आपले विचार व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी शिवरायांच्या कार्यविषयी माहिती सांगितली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजच्या युवकांनी शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते महाराजांच्या विचारांचे आचरण केल्यानंतर माणसाची प्रगती होऊ शकते व समाज परिवर्तन करायला मदत होते असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. भारती चंदनकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, कार्यालयीन अधीक्षक, समन्वयक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या