पेपर विक्रेते महेश कुलकर्णी यांचा प्रामाणिकपणा

 

पेपर विक्रेते महेश कुलकर्णी यांचा प्रामाणिकपणा

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे

अकलूज दिनांक 01/02/2026 :

आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात माणूस इतका व्यस्त झाला आहे की जवळच्या मित्राला अथवा नातेवाईकाला बोलायला सुद्धा वेळ नसतो. वेळप्रसंगी आपलं साहित्य किंवा वस्तू कोठे विसरलं आहे याचेही भान रहात नाही. असाच एक प्रकार अकलूज बस स्थानकावर घडला. बाळासाहेब कांबळे हे आपल्या भगिनीला सोडायला अकलूज बस स्थानकावर आले असता, भगिनीला बस मध्ये बसवल्यानंतर  स्थानकावर असलेल्या पेपर स्टॉलवर वर्तमानपत्र खरेदी केले आणि स्वतःचा मोबाईल तेथेच विसरून गेले. त्याच दरम्यान बाळासाहेब कांबळे यांच्या मोबाईलवर त्यांच्याच मुलीचा कॉल आला. तो कॉल वृत्तपत्र पेपर स्टॉल मध्ये असलेले पेपर विक्रेता महेश कुलकर्णी यांनी तो कॉल रिसीव करून सांगितले की हा फोन पेपर स्टॉलवर विसरलेला आहे. त्यानंतर कांबळे यांच्या मुलीने संपर्क साधून वडिलांना सांगितले की तुमचा मोबाईल बस स्थानकावरील पेपर स्टॉलवर विसरला आहे. किमान एक तासानंतर बाळासाहेब कांबळे हे बस स्थानकावरील पेपर स्टॉलवर गेले. त्यावेळी महेश कुलकर्णी यांनी प्रामाणिकपणाने किमान 25 हजार रुपये किमतीचा मोबाईल त्यांना परत केला. आजही जगात प्रामाणिकपणा जीवंत असल्याचं महेश कुलकर्णी यांच्या या प्रामाणिकपणामुळे दिसून येत आहे. ही घटना समजल्यानंतर सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी महेश कुलकर्णी यांचे  विशेष अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. खूप छान,प्रामाणिकपणे किमती वस्तू परत दिली. शिवाय एक संस्कार आणि प्रेरणा इतरांना मिळाली.

    उत्तर द्याहटवा