सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये निवड
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 18/02/2026 : सांगोला येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शुक्रवारी पार पडलेल्या बजाज ऑटो लिमिटेड पुणे या कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पदविका इलेक्ट्रिकल तृतीय वर्षामध्ये शिकत असणाऱ्या कु. कोमल रागडे व कु. सुप्रिया भिंगारदिवे या विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि. पुणे या नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले.
या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.सागर कांबळे व प्रा. पल्लवी फुले तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

0 टिप्पण्या