महर्षि संकुलात सहकार महर्षिंचा ४७ वा पुण्यतिथीदिन संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज दिनांक 11/02/2026 :
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि कै. शंकरराव नारायणराव मोहिते पाटील यांचा ४७ वा पुण्यतिथीदिन महर्षि संकुल यशवंतनगर येथे संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथीं कु.भाग्यश्री शेंडे (अधिकारी, अकलूज प्रादेशिक परिवहन कार्यालय), शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सनस , वसंत जाधव, ॲड. नितीन खराडे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी प्रास्ताविक केले, कु. वेदिका सराटे व सहशिक्षक अनंत कोळी यांनी सहकार महर्षिंच्या जीवनकार्याबाबत मनोगत व्यक्त केले . "मोठे यश मिळवण्यासाठी जिद्द चिकाटी मेहनत करणे आवश्यक" असल्याचे भाग्यश्री शेंडे यांनी सांगितले ,अध्यक्षीय मनोगतामध्ये बाळासाहेब सनस यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
सदर प्रसंगी विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व प्रशाला समिती सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पाचपुंड तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पारसे यांनी केले .

0 टिप्पण्या