एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! महिलांना 50% आणि ज्येष्ठांना 75% भाडे सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य

 एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! महिलांना 50% आणि ज्येष्ठांना 75% भाडे सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 23/02/2026 :

 आतापर्यंत केवळ आधार कार्ड दाखवून महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास मिळत होता. मात्र, नवीन नियमानुसार आता सवलतीचा लाभ घेण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे कार्ड नसल्यास प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागतील.

 हा बदल का करण्यात आला?

* सवलतींच्या नावाखाली होणारा गैरवापर रोखण्यासाठी ही डिजिटल प्रणाली आणली आहे.

* व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.

* प्रवाशांना कॅशलेस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे.

* हे कार्ड एक प्रकारचे 'प्री-पेड' वॉलेट असून यामुळे सुट्या पैशांची कटकट संपणार आहे.

 NCMC कार्ड म्हणजे काय? 

> हे एक प्री-पेड स्मार्ट कार्ड आहे

> कॅशलेस प्रवासाची सुविधा देते

> व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणते

> भविष्यात इतर सार्वजनिक वाहतुकीतही वापरता येऊ शकते

NCMC कार्ड कसे काढावे? (Step-by-Step)

1️⃣ *जवळच्या एसटी डेपोला भेट द्या* 

> तुमच्या परिसरातील एसटी आगारातील “Smart Card” खिडकीवर जा 

2️⃣ अर्ज भरा 

> नाव, पत्ता, वय, मोबाईल नंबर अशी माहिती भरा 📄

3️⃣ आवश्यक कागदपत्रे जोडा 

> आधार कार्ड अनिवार्य

> विद्यार्थ्यांसाठी ‘सरल’ नंबर

> दिव्यांगांसाठी UDID कार्ड अनिवार्य आहे

4️⃣ OTP व्हेरिफिकेशन 

> नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP ऑपरेटरला सांगा 

5️⃣ शुल्क भरा 

>  नवीन कार्ड – १९९ रुपये 

>  जुने स्मार्ट कार्ड बदल – १४९ रुपये 

6️⃣ कार्ड मिळवा 

> साधारण ३० दिवसांच्या आत तुमचे NCMC कार्ड तयार होईल 

 महत्त्वाच्या सूचना 

कार्डमध्ये किमान १०० रुपये बॅलन्स असणे आवश्यक

* कार्ड रिचार्ज करण्यासाठी तुम्ही एसटी कंडक्टरची मशीन ETIM मशीन, अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा डेपो एजंटकडून रिचार्ज करता येईल

* लवकरच ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता

 महिला आणि ज्येष्ठांनी काय करावे? 

५०% सवलत घेणाऱ्या महिलांनी तात्काळ कार्ड काढावे

७५ वर्षांवरील ज्येष्ठांनीही NCMC कार्ड काढणे आवश्यक

आधार कार्ड आता केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल, परंतु प्रत्यक्ष सवलतीसाठी एनजीएमसी कार्डच स्कॅन करावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या