विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे

अकलूज दिनांक 20/02/2026 :

आपले वागणे-बोलणे नेहमी चांगले असावे. त्यामध्ये प्रेम, आपुलकी, आदर असावा. चांगले वाचले, ऐकले, पाहिले की आपोआप आपल्याला पण चांगले वागण्याची प्रेरणा मिळते त्यासाठी नेहमी चांगली संगत ठेवू.

चांगुलपणा हा नीतिमूल्यातील एक अमूल्य दागिना आहे. तो सर्वांनाच शोभून दिसतो. काही लोक चांगले वागणाऱ्या लोकांना कमजोर समजतात, त्यांची टर उडवतात. तिकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरते.

मुलांनो, याचे मोल उशिरा लक्षात येते. बालपणी एकदा अनेक सदगुण अंगी भिनले व स्वभावात चांगुलपणा आला की मोठेपणी तुम्ही एक समाधानी व आनंदी जीवनाचा अनुभव घेऊ शकता व इतरांनाही आनंद देऊ शकता.

दुसऱ्याशी चांगले वागा, चांगलेपणाचा अनुभव घ्या.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या