मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 31/01/2026 :
जीवनात जितके जास्त व्यस्त असाल तितके मस्त जीवन जगाल. मन रिकामे असले की त्यात अनेक विचार येतात. ते विचार पण शक्यतो नकारात्मक असतात.
भूतकाळात कोण काय बोलले, कोण कसे वागले हे आठवत राहते. चांगले अनुभव सहसा आठवत नाहीत पण कधी कळी आलेले वाईट अनुभव काल घडल्यासारखे डोळ्यापुढे उभे राहतात आणि मनाला क्लेश देतात.
त्यासाठी मन गुंतलेले ठेवा, वर्तमानात रहा. जे करायचे ते चांगलेच करायचे, भल्यासाठी बोलायचे, दुसऱ्याचे भले चिंतायचे असेच मनाला वळण लावले तर आपले जीवन नक्कीच सत्कारणी लागेल.
आजचा संकल्प
विनाकारण दुःख देणाऱ्या भूतकाळात अडकण्यापेक्षा स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये व कृतीमध्ये गुंतवू. व्यस्त राहू व मस्त जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या