सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

 

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न  

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 25/01/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दि.२४ रोजी पदवी व पदविका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. 

 या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  माजी विद्यार्थी कु. जुलेखा पठाण (सहाय्यक अभियंता, जलसंपदा विभाग अकलूज) व ॲल्युमिनि असोसिएशन प्रेसिडेंट किरण माने, पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे हे उपस्थित होते. 

यावेळी सर्व आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आलेल्या मान्यवरांचा आदर्श घेऊन आपल्या भावी आयुष्याची वाटचाल करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी केले. या  मेळाव्यासाठी 100 पेक्षा जास्त  विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सदर विद्यार्थी मेळाव्याच्या नियोजनामध्ये माजी विद्यार्थी असोसिएशनच्या  सर्व सदस्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले व ते सांगत असताना आपल्या ग्रामीण भागामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करून आपल्याला अभियांत्रिकीच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे विशेष आभार मानले. तसेच कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची होत असलेली प्रगती याचे  विशेष कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना शासकीय, औद्योगिक व खाजगी क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. भारती चंदनकर यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.संजय झंजे, प्रा.पल्लवी फुले व प्रा. नानासाहेब काळे तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या