आदित्य भागवत सरवदे
याचा जनसेवा संघटनेतर्फे सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 24/01/2026 : अकलूज (ता. माळशिरस) गावातील मल्ल पै. आदित्य भागवत सरवदे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचा शिष्य याने बँकाॅक थायलंड येथे झालेल्या इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, सवतगावचे माजी सरपंच धनाजी जाधव, बबन काटकर , संजय दुणागे आदी मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या