विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/01/2026 : आपण लहानपणापासून घरात शिस्तीने वागायला हवे. थोडा पोरकटपणा केला तरी काही बाबतीत लहान असलो तरी जबाबदारी समजली पाहिजे म्हणजे मोठेपणी बाहेर समाजात वावरताना एक जबाबदार नागरिक म्हणून आपण वावरू शकतो.
कोणत्याही प्रकारचा कचरा डब्यात टाकायचा, डब्यातील कचरा ओला व सुका असा वेगवेगळा टाकायचा. नळ चालू ठेऊन ब्रश करणे, भांडी धुणे असे न करता मग मध्ये, बदली मध्ये पाणी घेऊन बेताने वापरायचे. अनावश्यक वीजेचा वापर टाळायचा.
मुलांनो, अशा अनेक गोष्टी आहेत की बालपणापासून जर त्या सवयी लावून घेतल्या तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने त्या योग्य ठरतील.
स्वतः घडा, इतरांना घडवा.
सौ. स्नेहलता स. जगताप._

0 टिप्पण्या