मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 19/01/2026 :

जीवन जगताना सभोवताली भरपूर माणसे भेटतात. आपली असतात, परकी असतात.नात्याची, रक्ताची, जोडलेली, ओळखीची-अनोळखी अशी भरपूर माणसे येत जात असतात.

जी आपलेपणाने जवळ येतात, सुख-दुःखात सहभागी होतात, न मागता मदतीचा हात देतात, योग्य वेळी पाठीवर थाप देतात आणि वेळप्रसंगी कान ही पकडतात ती खरी आपली माणसे.

कोणाला जबरदस्तीने आपले बनवता येत नाही. ती आतून ओढ असावी लागते. इतरांना जीव लावणे, आधार देणे, अडचणीत सोबत राहणे या गोष्टी ज्यांना जमतात त्यांना माणसे आपोआप जोडली जातात.

आजचा संकल्प

आपली माणसे व आपलेपणा असलेली माणसे यातील फरक जाणून घेऊ व आपल्यातील आपलेपणा जपू, वाढीस लावू व माणसे जोडू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या