विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 31/12/2025 :
शालेय शिक्षण चालू असताना जिद्द, सराव, चिकाटी या गोष्टी हव्यातच पण जोडीला स्पष्ट ध्येय हवे. बघू, ठरवू नंतर वगैरे बोलून आपण आपलीच फसवणूक करत असतो.
ध्येय निश्चित असले की त्यादृष्टीने तयारी करता येते. म्हणून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात ज्यांनी उंच भरारी घेतली आहे त्यांचे विचार ऐका, वाचा, त्यांची चरित्रे वाचा, त्यांच्याबद्दल इतरांच्याकडून ऐका. जेणेकरून तुम्हाला त्यामधून प्रेरणा मिळेल.
मुलांनो, स्वतःला घडवणे हे पूर्णपणे आपल्या हातात असते. त्यासाठी मोठमोठे क्लासेस, जाडजूड पुस्तके लागत नाहीत. सुरुवातीला ध्येय निश्चित करणे व त्या दिशेने पूरक प्रयत्न करणे जास्त महत्वाचे.
शिक्षणाच्या जोरावर गरिबीतून वर आलेली अनेक व्यक्तिमत्वे आपला आदर्श ठेवा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या