मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 25/12/2025 :

आपण आपल्या कुटुंबातील नात्यातील किंवा मैत्रीतील व्यक्तींच्या बाबतीत  समजुतदारपणा दाखवला पाहिजे तसा तो सार्वजनिक ठिकाणी पण दाखवला पाहिजे.

सार्वजनिक ठिकाणी म्हणजे आपण बस मध्ये, सिनेमा हॉल, मॉल किंवा मार्केटमध्ये असताना कोणी रांगेचे नियम पाळत नाही, कोणी जोर जोरात बोलत असतात किंवा भांडतात अशा वेळेस इतरांनी समंजसपणे तो प्रसंग हाताळला पाहिजे.

चिडक्या व्यक्तींना नियम दाखवणे किंवा शिस्त शिकवणे यातूनही दंगल-गोंधळ होऊ शकतो त्यामुळे इथे सुद्धा संयम तर कधी समजुतदारपणा दाखवणे इष्ट ठरते.

आजचा संकल्प

सार्वजनिक ठिकाणी जिथे परिस्थिती हाता बाहेर जाण्याची किंवा चिघळण्याची शक्यता असते तिथे इतरांचा समजुतदारपणा खूपच महत्वाचा असतो हे लक्षात घेऊ व वातावरण नियंत्रणात ठेवू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या