📖✒️ अपेक्षांचं ओझं..✍️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/12/2025 :
कधी कधी आपण कुणाकडून फार काही अपेक्षा ठेवतो. एखाद्या नात्यात, एखाद्या नजरेत, किंवा एखाद्या शब्दांतही आपण प्रेम शोधतो. आपल्या मनाच्या कोपऱ्यात आपण त्या व्यक्तीभोवती एक सुंदर, टिकाऊ आणि सुरक्षित जगाची कल्पना उभी करतो, जिथे प्रेम आणि साथ हे शब्द कधीच संपणार नाहीत.
आणि जेव्हा त्या अपेक्षा तुटतात ना, तेव्हा मन फुटत नाही, तर हळूच गप्प राहतं. तो शांतपणा सर्वात मोठा दर्द असतो.
बाहेरून सगळं ठिक दिसतं, आपण हसतो, बोलतो, जगतोही. पण आत मात्र वादळं उठलेली असतात. त्या अपेक्षांच्या तुटलेल्या तुकड्यांची राख जमा झालेली असते आणि आपण त्याच राखेतून चालत राहतो. ते शांत झालेले मन, व्यक्त न झालेली वेदना ही अनेकदा मोठ्या आवाजातील रडण्यापेक्षाही जास्त खोल जखम देऊन जाते.

या प्रश्नाची उत्तरं शोधण्यात खूप वेळ वाया जातो. पण खरं सांगायचं तर, अपेक्षा ठेवणं ही माणसाचीच सवय आहे, कारण आपण हृदयाने जगतो, हिशोबाने नाही. प्रेम करताना आपण भविष्यातील धोका किंवा नुकसान यांचा विचार करत नाही; आपण फक्त ते नातं पूर्णत्वाने जगतो.
म्हणूनच.
स्वतःवर प्रेम करणं, स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं, हे सर्वात गरजेचं असतं.
दुसऱ्यांनी दिलेली साथ क्षणभंगुर असू शकते, पण स्वतःची साथ कायमची असते. तुटलेल्या अपेक्षांच्या ओझ्यातून बाहेर पडून, पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी ही शिकवण आयुष्यात एक नवी दिशा देते.
ShradDhanesh's_Dairies

0 टिप्पण्या