विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 25/12/2025 :

आपल्यावर नेहमी चांगले वागण्याचे संस्कार केले जातात. उलट बोलू नये, अपशब्द वापरू नयेत, कोणाला उद्धटपणे बोलू नये वगैरे. थोडक्यात चांगले बोलावे.

जेव्हा अनेकजण गोड बोलतात, गोड वागतात तेव्हा आपल्याला त्यांचा चांगुलपणा भावतो. आपल्याला त्या व्यक्ती आवडू लागतात. मात्र क्वचित प्रसंगी असे चांगले वागणे वरवरचे असते.

मुलांनो, अनेकजण स्वार्थासाठी, त्यांचे काम साधून घेण्यासाठी गोड बोलतात. आपल्याशी खूप चांगले व आपुलकीने वागतात. त्यांचा मतलब साध्य झाला की नंतर ओळख पण दाखवत नाहीत. असे लोक वेळीच ओळखा.

चांगले असणे व चांगले आहोत असे दाखवणे यातील फरक ओळखा व वेळीच सावध व्हा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या