मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 26/12/2025 :

नम्र वाणी हा एक सदगुण आहे. आपल्या मृदु बोलण्याने समोरील व्यक्ती कितीही कठोर असली तरी आपल्या नम्र व हळुवार बोलण्याने ती व्यक्ती पण मृदु बोलते.

मोठ्याने, आरडा ओरडा करून, शिवीगाळ करून बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीबरोबर आपण तसेच, त्याच तार स्वरात बोललो तर दोन्हीकडून अजून आवाज वाढतात. आगीत तेल ओतल्याप्रमाणे भडका उडतो.

या उलट समोरच्या तारस्वरात बोलणाऱ्या व्यक्तीशी आपण संयमाने व शांतपणे बोललो तर आगीवर पाण्याचा शिडकावा टाकल्याप्रमाणे होते. समोरील व्यक्तीचा यथावकाश राग शांत होतो.

आजचा संकल्प

समोरच्या व्यक्तीच्या त्रासदायक सवयी बदलायच्या असतील तर आपण नेमके विरुद्ध वागायचे हा मंत्र लक्षात घेऊ व आपल्या सभोवतालचे वातावरण बदलवू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

=====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या