सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आय.ई.आय. सोलापूर केंद्राची द्वितीय बैठक संपन्न

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आय.ई.आय. सोलापूर केंद्राची द्वितीय बैठक संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 22/12/2025 : इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) सोलापूर केंद्राची दुसरी बैठक शनिवार, 20 डिसेंबर 2025 रोजी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर येथे  महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

या बैठकीच्या निमित्ताने सकाळच्या सत्रात विद्यार्थी व प्राध्यापक सदस्यत्व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले यांच्या उपस्थितीत झाले.

आय.ई.आय. सोलापूर केंद्राचे सचिव ओम दारक यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली.

यावेळी आय.ई.आय. सोलापूर केंद्राचे माजी अध्यक्ष डॉ. मोहन देशपांडे यांनी आय.ई.आय.  सदस्यत्वाचे व्यावसायिक, शैक्षणिक व करिअरविषयक लाभ उपस्थितांना समजावून सांगितले.

सोलापूर केंद्राचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत जोशी यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांना आय.ई.आय.  चे सदस्य होण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत भविष्यकालीन दृष्टीकोन मांडला. संस्थेच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांचा विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग हा महत्त्वाचा असून आय.ई.आय. सारख्या प्रोफेशनल विद्यार्थी मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे असे प्रामुख्यांने नमूद केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व यजमान संस्थेकडून मिळालेल्या उत्कृष्ट व्यवस्थापन व आदरातिथ्याबद्दल सर्व उपस्थितांनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या