"कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर आपलं ध्येय निश्चित असायला हवं" - डॉ.अजिंक्य व्होरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/12/2025 : कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर आपलं ध्येय निश्चित असायला हवं असे मत डॉ.अजिंक्य व्होरा यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचे ज्ञान व्हावे शेतकऱ्यांच्या मालाचे महत्त्व समजावे यासाठी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मांडवे (ता.माळशिरस जि. सोलापूर) येथे 23 डिसेंबर 2025 शेतकरी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ.अजिंक्य व्होरा पूढे बोलताना म्हणाले कि, विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर त्यांनी आपलं ध्येय निश्चित करायला हवं. प्रत्येकाने डॉक्टर, इंजिनियरच न होता शेती करायची असेल तर त्यामध्ये अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत व आधुनिक पद्धतीने शेती करता येते.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रगतशील बागायतदार कृष्णकांत फुले यांनी सांगितले की सेंद्रिय पद्धतीने शेती केली पाहिजे. रासायनिक खते पिकांसाठी वापरल्यामुळे त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात व मोठमोठ्या आजारांना बळी पडावे लागते. स्नेहल घुगरदरे यांनी पिझ्झा बर्गर ऐवजी शेतकऱ्यांच्या भाकरी, चपातीला महत्त्व आजच्या तरुण पिढीने दिलं गेलं पाहिजे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी खाऊचे स्टॉल देखील लावले होते. हे ज्ञान संकुल पूर्ण बाजाराने गजबजुन गेले होते. यामध्ये एक लाख रुपये ची उलाढाल झाल्याचे दिसून आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी,अक्षय शिक्षण संस्थेचे सचिव दिलीप चंद्रकांत घुगरदरे, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद दोशी मार्गदर्शक वीरकुमार दोशी, वैभव शहा, उदय धाहिंजे, वसंत ढगे, ढोपे, बबन गोफणे, रामभाऊ कर्णे, अभयकुमार दोशी, फडतरे, कुलकर्णी, ज्ञानेश राऊत, दीपक राऊत, भोंगळे, पालक संस्थेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


0 टिप्पण्या