🔹भाजपाच्या खात्यात पैशांची रास, तर काँग्रेसच्या खात्यातील शिल्लक घटली

 🔹भाजपाच्या खात्यात पैशांची रास, तर काँग्रेसच्या खात्यातील शिल्लक घटली

> माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 13/12/2025 :

Congress MP Ajay Makan Parliament Speech : राज्यसभेत गुरूवारी निवडणूक सुधारणा विषयावर चर्चा पार पडली. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या खडाजंगीमुळे ही चर्चा चांगलीच तापली होती. राज्यसभेतही या विषयावर चर्चा झाली. काँग्रेसचे खजिनदार, खासदार अजय माकन यांनी या चर्चेत भाग घेताना अतिशय महत्त्वाची अशी आकडेवारी सादर केली. 'खेळाच्या मैदानातील अम्पायरच जर दोन पैकी एका संघाची जर्सी घालून मैदानात येत असेल तर दुसरा संघ करेल तरी काय?', असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांच्या अकाऊंटमध्ये किती शिल्लक आहे. याची दोन दशकांची माहिती सादर केली.

खासदार अजय माकन आपल्या भाषणात म्हणाले, 'भारताला जगभरात लोकशाहीची जननी म्हटले जाते. पण आज जी तथ्ये मी मांडणार आहे, त्यावरून असे दिसते की, भारतात लोकशाही जिवंत नाही. लोकशाही शाबूत ठेवण्यासाठी सर्व पक्षांना समान संधी, पारदर्शकता आणि विश्वसनीयता हे तीन घटक महत्त्वपूर्ण असतात. पण भारतात हे तीन घटक गुंडाळून ठेवल्याचे दिसतात. मी खासदार असल्याबरोबर काँग्रेसचा खजिनदार आहे. त्यामुळे मी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सर्वच पक्षांच्या अकाऊंटची माहिती तपासत असतो. यातून जे आकडे समोर आले, ते अतिशय धक्कादायक आहेत.'

यानंतर अजय माकन यांनी २००४ पासून काँग्रेस आणि भाजपाच्या बँक खात्यातील रकमेची आकडेवारी सादर केली. ते म्हणाले, २००४ साली भाजपाच्या खात्यात ८८ कोटी आणि काँग्रेसच्या खात्यात ३८ कोटी होते. भाजपाच्या खात्यात काँग्रेसपेक्षा दुप्पट पैसे होते. त्यानंतर २००४ साली काँग्रेसप्रणीत यूपीएचे सरकार आले. त्यामुळे निधीचा ओघ वाढला. ज्यामुळे २००९ साली काँग्रेसच्या खात्यात २२१ कोटी रुपये तर भाजपाच्या खात्यात १५० कोटी रुपये जमा झाले. पुन्हा यूपीए २ चे सरकार आले. २०१४ साली काँग्रेसच्या खात्यात ३९० कोटी तर भाजपाच्या खात्यात २९५ कोटी रुपये होते.

२०१४ नंतर भाजपाच्या खात्यात हजारो कोटींची माया

खासदार अजय माकन यांनी म्हटले की, २०१४ पर्यंत सत्ताधारी आणि विरोधक यांच्या खात्यातील रक्कम ही ६०-४० या गुणोत्तरात होती. मात्र २०१४ नंतर यात फार मोठी तफावत आली. २०१९ साली काँग्रेसच्या खात्यात ३१५ कोटी तर भाजपाच्या खात्यात ३,५६२ कोटी रुपये जमा झाले होते. आणखी पाच वर्षांनी म्हणजे २०२४ साली काँग्रेसच्या खात्यात केवळ १३३ कोटी तर भाजपाच्या खात्यातील रक्कम १०,१०७ कोटींवर पोहोचली.

२०१९ पासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या खात्यातील तफावत ही ९९ टक्के विरुद्ध १ टक्के अशी आहे. काँग्रेस पेक्षा ७५ टक्के अधिक पैसे भाजपाच्या खात्यात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकृत पैसा एकाच पक्षाकडे असेल तर कोणत्या आधारावर इतर पक्षांना समान पातळीवर संधी मिळेल? असा प्रश्न खासदार अजय माकन यांनी उपस्थित केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या